पाचव्या दिवशीही दोनशेहून अधिक रुग्णांची वाढ

Foto

जिल्ह्यात आज २०८ रुग्णांची वाढ; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९७४ वर

औरंगाबाद जिल्ह्यात आज पाचव्या दिवशीही दोनशेहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. आज सकाळी २०८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९७४ वर गेली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. 

आज सकाळी आलेल्या अहवालानुसार आज पाचव्या दिवशी देखील पुन्हा दोनशे हुन अधिक एकूण २०८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये १२२ पुरूष, ८६ महिला आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९७४ पोहचली आहे. त्यापैकी २४४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २२९० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील आढळलेले ११५ रुग्ण
आज सकाळी आलेल्या अहवालात मनपा हद्दीतील रशीदपुरा २,नारेगाव १, भारतनगर ७, नारळीबाग २, बौद्धविहार २, हडको एन नऊ १, शिवशंकरकॉलनी १, आकाशवाणी परिसर ३, राम नगर, एन दोन १, जुना मोंढा १, जटवाडा रोड, हर्सुल १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ ७, हनुमाननगर ३, होनाजी नगर २, जय भवानीनगर ३, इंद्रप्रस्थ सिडको ४, एसटी कॉलनी ५, एन सहा, सिडको १, एन बारा सिडको ३, एन चार सिडको १, जटवाडा रोड १, जाधववाडी २, चेलिपुरा १, अंबिकानगर ६, सुरेवाडी १, गजानननगर ६, छावणी १, गवळीपुरा,छावणी १, न्यायनगर १, पद्मपुरा १, न्यू हनुमाननगर १, जयसिंगपुरा १, एन चार सिडको १, शिवाजीनगर ५, ठाकरेनगर १, गारखेडा २, बायजीपुरा ३, एन अकरा, सिडको १, मयूरनगर २, खोकडपुरा ३, कलाग्राम परिसर १, मुकुंदवाडी १, विजय नगर १, विनायक कॉलनी १, सुभाषचंद्र नगर,एन अकरा १, सिद्धेश्वर कॉलनी १, अविष्कार कॉलनी१, एन आठ, सिडको ५, मातानगर २, एन अकरा, हडको १, ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर २, नक्षत्रवाडी १, मनपा परिसर २, संजयनगर १, इतर २ या भागातील ११५ रुग्ण आढळून आले आहेत. 
ग्रामीण भागातील ९३ रुग्ण या भागातील
ग्रामीण भागात आज ९३ रुग्ण आढळून आले त्यात सिडको वाळूज महानगर एक, वाळूज १०, खुलताबाद-१, दौलताबाद १, शरणापूर ८, अश्वमेध सोसायटी, बजाजनगर २, आंबेडकर चौक, बजाजनगर ३, अयोध्यानगर, मोरे चौक -४, सिडको पंचमुखी महादेव परिसर -१, ऋणानुबंध सोसायटी, बजाजनगर २, जयभवानी चौक, बजाजनगर २, सिंहगड कॉलनी, बजाजनगर -३, आदर्श गजानन सोसायटी, बजाजनगर २, दत्तकृपा सोसायटी, बजाजनगर १, सरस्वती सो. १, न्यू दत्तकृपा सो. ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर २, नंदनवन सोसायटी १, साईश्रद्धा पार्क, बजाजनगर (5), साऊथ सिटी २, ज्योतिर्लिंग सोसायटी,बजाजनगर २, शिवकृपा सोसायटी तनवाणी शाळेजवळ २, जय हिंद चौक, बजाजनगर २, बजाज विहार, बजाजनगर २, मथुरा सोसायटी १, स्वामी समर्थ नगर, बजाजनगर १, त्रिमूर्ती चौक २, कृष्णामाई सोसायटी बजाजनगर ३, बौद्ध विहार, बजाजनगर-२, बजाजनगर १, गणेश नगर सोसायटी १, विजयनगर, वडगाव, बजाजनगर १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, कन्नड १, वडनेर, कन्नड १, नागद, कन्नड १, पोस्ट ऑफिस जवळ, पैठण ६, यशवंत नगर, पैठण १, बोजवारे गल्ली , गंगापूर १, वाळूज, गंगापूर ४, शिवाजी नगर, गंगापूर ३ या भागातील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker